हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| जर तुम्हाला खेळाची आवड असेल आणि त्याच क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण की, स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAI) ने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या अंतर्गत हेड कोच (बॉक्सिंग), हेड कोच (जुडो) आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग एक्सपर्ट-लिड या पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
ऑनलाइन अर्जाची सुविधा
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना sportsauthorityofindia.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून १५ मार्च २०२५ ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांनी आपले अर्ज वेळेत सादर करावे.
पात्रता आणि वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित खेळातील डिप्लोमा आणि किमान १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे निर्धारित करण्यात आली आहे.
पगार
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १,००,००० ते १,५०,००० इतका आकर्षक पगार मिळणार आहे. ही संधी खेळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची आहे.
अर्ज प्रक्रिया आणि पत्ता
अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असून तो डाउनलोड करून भरावा लागणार आहे. त्यानंतर भरलेला अर्ज पुढील पत्त्यावर पाठवावा.
पत्ता – निदेशक, खेळ आणि युवा व्यवहार संचालनालय, जिमी जॉर्ज इंडोर स्टेडियम, तिरुवनंतपुरम, केरळ.
दरम्यान, खेळासोबतच बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. नुकतीच बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. महत्वाचे म्हणजे, खेळात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाची तर बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी बँक ऑफ इंडियाची संधी फायदेशीर ठरू शकते.