सातारा| येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आजपासून सुरू झालेल्या टेबल टेनिस मार्गदर्शन शिबिराचे उदघाटन करताना इनडोअर व आऊट डोअर खेळ हे मानसिक व शारीरिक आरोग्य योग्य ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याने एखादा तरी खेळ खेळलाच पाहिजे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी केले.
डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स अँड फिजिकल एज्युकेशन आणि कर्मवीर विद्याप्रबोधिनी यांच्या सयुंक्त विद्यमाने सहा दिवसांचे टेबल टेनिस व बॅडमिंटन मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आजपासून सुरू होणाऱ्या टेबल टेनिस शिबिरात कोच संग्राम राजेशिर्के व त्यांचे सहायक रवितेज मुळे हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिमखाना विभागप्रमुख प्रा. उदय शिंदे यांनी दिली.
टेबल टेनिससारख्या खेळामुळे आपली एकाग्रता वाढते तसेच शरीराची लवचिकता वाढल्यामुळे काम करण्यास उत्साह वाढतो त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन स्टुडंट डेव्हलपमेंट डीन डॉ. मनिषा आनंद पाटील यांनी केले.
यावेळी प्रा.गौरव जाधव, प्रा.तुषार पोवार उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाचे नियोजन चैतन्य याने केले.