हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्पॅनिश फुटबॉल क्लब रियल माद्रिदचे माजी प्रशिक्षक फॅब्रिओ कॅपेल्लो म्हणाले की,”माझ्या कोचिंग करियरमध्ये ब्राझीलचा महान फुटबॉलपटू रोनाल्डो एक हुशार प्रतिभावान खेळाडू म्हणून उदयास आला.” कॅपेल्लोने असेही म्हटले आहे की.”या रोनाल्डोला पार्टी करणे आणि दारू पिणे आवडत होते . तसेच त्याच्या या आवडीमुळेच ड्रेसिंगरूममध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या.
कॅपेल्लोने स्काय स्पोर्ट्स इटालियाशी बोलताना सांगितले की, “माझ्या कोचिंग दरम्यान तो एक हुशार प्रतिभावन खेळाडू बनला होता. परंतु त्याच वेळी माझ्यासाठी तो ड्रेसिंग रूममध्ये सर्वाधिक समस्या निर्माण करणारा एक खेळाडूही होता. तो सतत पार्ट्या करायचा.”
त्यांनी पुढे सांगितले की, “एकदा (रूद) व्हॅन निस्टेलरॉय मला म्हणाला, कोच मला ड्रेसिंग रूममध्ये दारूचा वास येतोय. रोनाल्डो नंतर इंटर मिलान या टीमकडून खेळण्यास गेला आणि आम्ही जिंकण्यास सुरवात केली. पण जर आपण प्रतिभेबद्दल बोललो तर तो खूपच मोठा प्रतिभावान खेळाडू होता . त्याच्यात अलौकिक बुद्धिमत्ता होती यात शंकाच नाही. “
तत्पूर्वी, टॉटेनहॅमचे हॉस्टपरचे कोच जोस मॉरिन्हो म्हणाले की,” रोनाल्डो एक उत्तम खेळाडू आहे. रोनाल्डोने ब्राझीलकडून फुटबॉलचे ९८ सामने खेळले आहेत आणि त्यामध्ये त्याने ६२ गोल केले आहेत. ब्राझीलसाठी तो दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.
मात्र, ब्राझील दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा रोनाल्डो त्यावेळी जेव्हा पाच महिन्यांत दोनदा गुडघ्याच्या दुखापतीने ग्रस्त झाला तेव्हा तो त्याच्या कारकीर्दीमध्ये अव्व्ल स्थानी होता. यावेळी तो इंटर मिलानकडून खेळत होता. या दुखापतीतून सावरण्यास त्याला सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागला आणि २००२ वर्ल्ड कपच्या अगदी थोडे दिवस आधीच त्याने ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवले. या विश्वचषकात त्याने एकूण आठ गोल नोंदवून आपल्या ब्राझील संघाला विजयी होण्यास मदत केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.