श्रीशांतला ‘या’ राज्याच्या रणजी संघात मिळू शकते संधी,मात्र द्यावी लागेल फिटनेस टेस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१३ साली आयपीएल मध्ये स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे ७ वर्षाच्या बंदीचा सामना करीत असलेल्या भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतसाठी आता एक चांगली बातमी समोर आली आहे. केरळ रणजी संघाचे प्रशिक्षक टीनू योहानन यांनी गुरुवारी सांगितले की, भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतच्या केरळ क्रिकेट संघातील निवडीबाबत विचार केला जाईल. सप्टेंबरमध्ये श्रीशांतवर असलेली बीसीसीआयची बंदी संपणार आहे. मात्र त्याआधी त्याला आपली फिटनेस टेस्ट द्यावी लागेल.

बीसीसीआयने ऑगस्ट २०१३ मध्ये आयपीएल स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे श्रीशांतवर आजीवन बंदी घातली होती. मात्र, बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी गेल्या वर्षी त्याची शिक्षा कमी करून सात वर्षे केली. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेसाठी श्रीशांतच्या नावाचा विचार केला जाईल, असे माजी भारतीय वेगवान गोलंदाज योहानन म्हणाले. श्रीशांत पुन्हा केरळच्या संघात खेळत असल्याचे आपण पाहत आहोत. केरळमधील प्रत्येकाला याबद्दल उत्सुकता आहे. योहानन म्हणाले की,”श्रीशांतकडे आपल्या तंदुरुस्तीवर काम करण्यासाठी पुरेसा वेळ आहे.”

ते म्हणाले, ” श्रीशांतच्या बंदीची मुदत सप्टेंबरमध्ये संपेल. चांगली गोष्ट अशी आहे की त्याच्याकडे तयार होण्यास वेळ आहे. तो आपल्या खेळात आणि तंदुरुस्तीवर कठोर परिश्रम घेत आहे. आम्ही त्याची तंदुरुस्ती आणि खेळाचे मूल्यांकन करू. श्री नेहमीच आमच्या रणनीतीचा एक भाग असायचा. “आपला स्थानिक क्रिकेटचा हंगाम हा ऑगस्टमध्ये सुरू होणार होता पण कोविड -१९ साथीच्या आजारामुळे तो बदलला जाऊ शकतो.” योहानान म्हणाले की,” श्रीशांत सतत त्याच्या संपर्कात असतो.”

ते म्हणाले, “श्रीशांत माझ्याशी सतत संपर्कात राहिला आहे. तो त्याच्या गोलंदाजीवर आणि तंदुरुस्तीवर कठोर परिश्रम घेत आहे. जरी तो सात वर्षांपासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नसला तरी आपण त्याच्या तंदुरुस्तीचे आणि कौशल्यांचे मूल्यांकन केले पाहिजे. “भारताकडून तीन कसोटी सामने आणि अनेक एकदिवसीय सामने खेळणारे योहानन म्हणाले,”त्याच्या केरळ संघात पुनरागमन केल्याने आम्हाला आनंदच होईल. श्रीशांतने २७ कसोटी आणि ५३ एकदिवसीय सामन्यांमध्ये अनुक्रमे ८७ आणि ७५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दहा टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७ बळीही घेतलेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment