T20 विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर; पहा कोणाकोणाचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुन महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका यंदाचा T20 वर्ल्डकप खेळणार आहे. चरित असलंका उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. श्रीलंकेच्या या संघात आयपीएल मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या मथिशा पाथिराना आणि महिष थेक्षाना या युवा खेळाडूंना सुद्धा स्थान देण्यात आलेलं आहे.

ड गटात श्रीलंकेचा समावेश आहे

T20 विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा संघ ड गटात समावेश आहे, ज्यामध्ये बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांचाही समावेश आहे. श्रीलंकेचा संघ ३ जूनला न्यूयॉर्कमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक स्पर्धेचा श्रीगणेशा करेल. यानंतर संघ 8 जून रोजी डलास येथे बांगलादेशशी खेळेल. ग्रुप स्टेजच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये श्रीलंकेचा 12 जूनला नेपाळ आणि 17 जूनला सेंट लुसिया येथे नेदरलँड्सचा सामना होईल.

पथिराना दुखापतीमुळे बाहेर होता

पाथिराना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळतो, परंतु या मोसमात एका सामन्यात तो जखमी झाला आणि स्पर्धेतून बाहेर पडला. दुखापतीमुळे पाथिराना कोलंबोला परतला. यंदाच्या आयपीएल हंगामात त्याने चेन्नईसाठी सहा सामने खेळले ज्यात त्याने 13 विकेट घेतल्या. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट ७.६८ होता. महत्वाच्या क्षणी बळी मिळवण्यात पथीराना माहीर आहे.

टी-20 विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ-

वानिंदू हसरंगा (कर्णधार), चारिथ असलंका (उपकर्णधार), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदू मेंडिस, सदिरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजय डी सिल्वा, महिश थेक्षाना, दुनिथ वेलागे, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, मथिशा पाथिराना आणि दिलशान मदुशंका
राखीव खेळाडू : असिथा फर्नांडो, विजयकांत व्यासकांत, भानुका राजपक्षे, जनिथ लियानागे.