श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे म्हणाले,’भारत-चीन वादात आम्ही कोणाचीही बाजू घेणार नाही’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी एका न्युज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की,’ भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या वादामध्ये श्रीलंका कोणाचीही बाजू घेणार नाही. उलट ते त्यापासून दूरच राहतील. राजपक्षे म्हणाले की,’ या दोन्ही देशांशी त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यामुळे ते स्वत: ला या प्रकरणापासून दूर ठेवेल. तामिळ चळवळीबद्दल राजपक्षे म्हणाले की,’ त्या लोकांना हे समजले गेले पाहिजे की, वेगळा देश निर्माण करण्याचा पर्याय हा योग्य नाही आहे. कोणत्याही प्रकारच्या इस्लामिक किंवा तामिळीं दहशतवादावर कडक कारवाई करण्याविषयीही राजपक्षे यांनी सांगितले.

श्रीलंकेबरोबर चीनच्या संबंधांशी निगडित एक प्रश्नाला उत्तर देताना राजपक्षे म्हणाले- ‘श्रीलंका निर्बंधित परराष्ट्र धोरण राबवित राहिल. चीन आणि भारत हे दोघेही आपले जवळचे मित्र आहेत. श्री जवाहरलाल नेहरू आणि चिनी पंतप्रधान झोउ एनलाई यांनी जी पंचशील तत्त्वे मांडली होती. ज्यात प्रादेशिक अखंडता, सार्वभौमत्व, आक्रमकता धोरण, एकमेकांच्या खाजगी कामात हस्तक्षेप न करणे, समानता आणि शांततापूर्ण सहजीवन यासारखी मूल्ये होती. श्रीलंका देखील या तत्त्वांवर विश्वास ठेवते आणि त्यानुसार ते आपले परराष्ट्र धोरण कायम ठेवतील.

इस्लामिक दहशतवादाशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना राजपक्षे म्हणाले- ‘ही नक्कीच फार गंभीर समस्या आहे. मागील सरकार हे नियंत्रित करण्यात अपयशी ठरले हे स्पष्ट आहे. जर ते लोक सत्तेत राहिले असते तर भारत आणि बंगालच्या उपसागरामध्ये असलेल्या इतर शेजारच्या देशांनाही धोका वाढला असता. श्रीलंकेतील इस्टरच्या दिवशी चर्चवरील हल्ला हा आशिया खंडातील किंवा जगातील नागरिकांना लक्ष्य करणार्‍या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. सर्व आत्मघाती हल्ले करणारे चांगल्या घरातील सुशिक्षित तरुण होते. त्या सरकारकडे अशा हल्ल्यांची आधीच माहितीदेखील होती परंतु त्याला रॊखण्यात ते अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले. राजपक्षे म्हणाले की, तमिळ असो की इस्लामिक असो, दहशतवादाविरूद्ध नेहमीच कठोर कारवाई केली जाईल.

तामिळ समस्येशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात राजपक्षे म्हणाले- ‘तमिळ नेत्यांशी यासंबंधात दीर्घकाळापासून चर्चा सुरू आहेत. त्यांना हे समजायला हवे की हे शक्य नाही. या देशात त्यांनी स्वतंत्र तमिळ देशाच्या मागणीच्या आधारे बराच काळ राजकारण केले आहे. बहुतेक तमिळ लोक उत्तर आणि पूर्वेच्या बाहेर राहतात. पूर्वेला तामिळ आणि अल्पसंख्याक मुस्लिम लोकसंख्या अजूनही आहे. कोलंबो शहराची बहुतेक लोकसंख्या ही तामिळ आणि मुस्लिम आहेत. अशा परिस्थितीत श्रीलंकेच्या ईशान्य भागात तमिळ देशाची मागणी करणे योग्य ठरणार नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment