हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हॅलो सलग सहा टर्म पक्ष बदलले मात्र श्रीगोंद्यात आमदारकीचा चेहरा एकच राहिला… तो म्हणजे बबनराव पाचपुते… तालुक्याच्या राजकारणात पाचपुते या नावाची क्रेझ वेगळीच होती… पण 2014 ला राष्ट्रवादीच्या राहुल जगतापांनी पाचपुतेंच्या विजयाचा वारू अडवला…याच पराभवाचे उट्टे पाचपुतेंनी 2019 ला काढले… आणि पाचपुते यांचा निसटत्या लिडने विजय झाला… यावरून श्रीगोंदा म्हटलं की फक्त पाचपुतेच! असं तालुक्याचं समीकरण बनून गेलं… पण 2024 ला परिस्थिती बदललीये… आजारपणामुळे पाचपुते यांचा मतदारसंघातील संपर्क कमी झालाय… मात्र पत्नी प्रतिभाताई आणि चिरंजीव विक्रमसिंह सातपुते यांचा वावर बघता आमदारकी घरातच रहावी, असा त्यांचा हट्ट दिसतोय… दुसऱ्या बाजूला शिवाजीराव कर्डिलेंपासून ते छोट्या बड्या दहा प्रस्थापितांनी यंदा काहीही झालं तरी श्रीगोंद्याचे आमदार व्हायचंच, असा जणू मनाशी चंग बांधलाय… पण आकडेवारी बघितली तर श्रीगोंद्याला इतिहासात पहिल्यांदाच महिला आमदार मिळण्याचा चान्स या निवडणुकीच्या निमित्ताने चालून आलाय… श्रीगोंद्याची विधानसभा निवडणुकीची हीच ती स्पेशल ए टू झेड कहानी…
आजारी असले तरी पाचपुते आपल्या राजकारणाची लेगसी पुढच्या पिढीकडे देण्यासाठी पत्नी किंवा मुलगा यांना मैदानात उतरवणार, हे सध्या तरी स्पष्ट दिसतय… पण या वेळेस गेल्या वेळेस सारखा एकटा – दुकटा नाही तर विरोधकांची मोठीच्या मोठी फळी निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहे… मागीलवेळी अवघ्या चार- सहा हजार मतांनी विजयी झालेल्या पाचपुते यांच्यासमोर यावेळी आव्हान असणार आहे ते माजी आमदार राहुल जगताप, अनुराधा राजेंद्र नागवडे, शिवसेना उपनेते साजन पाचपुते, अण्णासाहेब शेलार, घनश्याम शेलार ते थेट शिवाजीराव कर्डिलेंसारख्या प्रस्थापित नेत्याविरुद्ध…आता कर्डिलेंचं नाव या सगळ्या सीनमध्ये कसं आलं ते सांगतो, लोकसभेला पडल्यानंतर सुजय विखे पाटलांनी राहुरीतून लढण्यासाठी तयारी केल्यानं म्हणूनच कर्डिले सध्या श्रीगोंदा विधानसभेसाठी आग्रही आहेत…
नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटातील गावे या मतदारसंघात आहेत. या दोन गटांमधील गावांना गेल्या काही वर्षात सापत्न वागणूक मिळाली आणि त्याच मुद्यावर यावेळी ही गावे एकत्र आली आहेत आणि आपलाच माणूस आमदार करायचा अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळेच कर्डिले यांच्या नावाला इथं गांभीर्याने घ्यावं लागतं… त्यातही कर्डिलेंचा श्रीगोंदा तालुक्यात नातेवाईक आणि मित्र परिवाराचा मोठा गोतावळा आहे…. याशिवाय मांडवगण गटात अरुणकाका जगताप यांचा मोठा संपर्क आणि काम आहे… हे सगळं कर्डिलेंना प्लस मध्ये ठेवू शकत… पण ही यादी काही इथंच थांबत नाही यासोबतच यातलं पुढचं नाव येतं ते अनुराधा नागवडे यांचं. लोकसभेपूर्वी नागवडे कुटुंबाने काँग्रेस बायबाय करुन अजितदादांच्या गटात प्रवेश केला. या प्रवेशावेळीच त्यांनी अजितदादांकडून विधानसभेचा शब्द घेतल्याचे बोलले जातेय. आता वळूयात राहुल जगताप यांच्याकडे.. पाचपुतेंना एकास एक फाईट द्यायची, म्हणून गेल्यावेळी राहुल जगतापांनी माघार घेतली होती. यावेळी ते लढण्याच्या मूडमध्ये आहेत. शरद पवार गटाकडून आपल्यालाच तिकीट मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे.
इच्छुकांत पाचवं नाव येत, ठाकरे गटात गेलेल्या साजन पाचपुते यांचं… साजन यांनाही खा. संजय राऊत यांनी विधानसभेचा शब्द दिल्याचे सांगितले जाते. तालुक्यात सहावे इच्छुक आहेत, गेल्यावेळी पाचपुतेंकडून फक्त साडेचार हजारांनी पराभूत झालेले घनश्याम शेलार… शेलार सध्या काँग्रेसमध्ये आहेत. मात्र काँग्रेसमध्ये जाताना त्यांनाही नाना पटोले यांनी विधानसभेचा शब्द दिल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात. म्हणजेत श्रीगोंद्यात प्रत्येक पक्षाचा तगडा नेता, विधानसभेसाठी इच्छुक आहे. ..मात्र श्रीगोंदा तालुक्यात रंगत आलीय, ती दुसऱ्या फळीतील इच्छुकांमुळे…जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णा शेलार यांनीही काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुक लढण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी आपल्या मुलाला बेलवंडीचा सरपंच ऋषिकेश शेलार याला सोबत घेत तालुक्यात बैठकाही सुरु केल्या. ज्या पक्षाकडून तिकीट मिळेल त्या पक्षाकडून किंवा थेट अपक्ष लढण्याचीही त्यांची तयारी आहे. शेलारांशिवाय भाजपच्या कट्टर कार्यकर्त्या सुवर्णा पाचपुते यांनीही निवडणूक रिंगणात उतरणारच असं ठामपणे सांगितल्याने श्रीगोंद्याचा राजकीय तिढा आणखीनच वाढलाय… या सगळ्यात पाचपुतेही आपण माघार घेतली तर आपल्या जागेवर पत्नी किंवा मुलगा यांपैकी एकाला तिकीट मिळायला हवं यासाठी धडपड केली आहे… त्यामुळे तिकीट वाटपाच्या कार्यक्रमापासून ते प्रत्यक्ष निकालापर्यंत श्रीगोंदा ही महाराष्ट्रातील सर्वात अटीतटीची लढत ठरू शकते…
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत एकही महिला आमदार झालेली नाहीये… यंदा इच्छुकांच्या यादीत बहुतांश महिलांची नाव असल्याने दोन्ही बाजूंनी महिला उमेदवारी देण्यावर भर दिला जाऊ शकतो… भाजपकडूनच सुवर्णा पाचपुते यांनीही दंड थोपटलेत. त्यापूर्वी अनुराधा नागवडे यांनीही प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केलाय. एवढ्या सगळ्या महिला उभ्या राहणार असतील, तर सहाजिकच राहुल जगताप हेही आपल्या पत्नी डाँ. प्रणोती जगतापांना पुढे करु शकतात. म्हणजेच श्रीगोंद्यात पहिल्यांदा महिला आमदार होण्याची शक्यता वाढते….श्रीगोंदा विधानसभेसाठी भाजपकडून आणखीन एका नव्याकोऱ्या नावाची चर्चा मतदारसंघात होऊ लागलीय ते नाव म्हणजे राज देशमुख यांचं… राज देशमुख हे आर्थिक विश्लेषक असून चांगुलपणाची चळवळीच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात महाराष्ट्रात अग्रेसर असतात….. या सगळ्या वरून श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांचा आकडा दोन डझन पार गेल्यामुळे कार्यकर्त्यांसह इच्छुकांचाही श्रीगोंद्याच्या राजकारणात पुढे नेमकं काय वाढून ठेवलंय? याची कल्पना नाहीये… पण गटातटाच्या राजकारणाला शह देत, राजकीय गोळा बेरीज करण्यावर भर देऊन सहानुभूतीच्या फॅक्टरवर जो स्वर होईल, त्याला इथून जिंकण्याचे चान्सेस सध्या तरी जास्त आहेत…
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निकालाच्या आकडेवारीवर एक वार नजर टाकली तर श्रीगोंदा विधानसभेमुळेच निलेश लंके यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला, ही वस्तुस्थिती आहे… श्रीगोंद्यांनं महाविकास आघाडीच्या म्हणजेच लंकेच्या पारड्यात तब्बल 32 हजारांचं लीड टाकलंय… त्यामुळे इथं महाविकास आघाडीचा उमेदवार आमदार होणार, हे तर कन्फर्म आहे… पण तो आमदारकीचा चेहरा कोण? यासंदर्भात आत्ताच स्पष्टपणे बोलता येणार नाही…स्थानिक पत्रकार आणि राजकीय विश्लेषकही श्रीगोंद्याला यंदा महिला आमदार मिळेल, असं सूचक विधान करत असतात… त्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी पहिली आमदार महिला होण्याचा मान नेमका कुणाला मिळतोय? की येणाऱ्या काही दिवसात श्रीगोंदा तालुक्यासमोर काही नव राजकारण वाढून ठेवलय का? तेही येणाऱ्या काळात स्पष्ट होईल…बाकी तुम्हाला काय वाटतं? प्रस्थापितांना डावलून श्रीगोंदा मध्ये पहिल्यांदाच नवा कोरा चेहरा आमदार म्हणून निवडून येईल का? श्रीगोंदा मध्ये एका महिलेच्या कपाळाला आमदारकीचा गुलाल लागेल का? आणि लागलाच तर ती महिला उमेदवार नेमकी कोण असेल? तुमचा अंदाज मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…