Tuesday, January 7, 2025

उद्या दहावीचा निकाल जाहीर होणार; या संकेतस्थळावर पाहता येईल निकाल

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल बुधवारी २९ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. बुधवारी २९ जुलै रोजी दुपारी १ वाजता निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच निकालाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना १ वाजल्यापासून निकाल पाहता येईल तसेच निकालाची प्रिंटही घेता येईल.

www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना श्रेणीव्यतिरिक्त कोणत्याही अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थी-पालकांना http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर स्वत: किंवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. या प्रक्रियांसाठी शुल्कदेखील ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे.

महत्त्वाच्या तारखा –

गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते ८ ऑगस्ट २०२०

छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते १८ ऑगस्ट २०२०

या परीक्षेला राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. संपूर्ण राज्यात परीक्षेसाठी ४ हजार ९७९ परीक्षा केंद्रे होती. एकूण २२ हजार ५८६ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. राज्यात दि. ३ ते २३ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा पार पडली. पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार होणाऱ्या परीक्षेसाठी १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यामध्ये ९ लाख ७५ हजार ८९४ मुले व ७ लाख ८९ हजार ८९४ मुली आहेत. राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली. एकूण ९ हजार ४५ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”