SSC CGL Bharati 2024 | ‘या’ ठिकाणी सरकारी नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

SSC CGL Bharati 2024 | जे लोक नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. आम्ही नेहमीच तुम्हाला नोकरीच्या विविध संधी देत असतो. त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होतो. अशातच आया कर्मचारी निवड आयोगाने SSC CGL 2024 या परीक्षेची अधिसूचना जारी केलेली आहे. त्यामुळे आता या भरती अंतर्गत गट B आणि गट C यांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत तब्बल 17 हजार 727 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे? | SSC CGL Bharati 2024

या भरतीची अर्ज प्रक्रिया 24 जून पासून सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे 24 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक पूर्ण महिना आहे. त्याचप्रमाणे अर्जामध्ये दुरुस्ती तुम्हाला 10 आणि 11 ऑगस्ट रोजी करण्यात करता येणार आहे.

अर्ज कुठे करायचा ?

या भरती अंतर्गत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला केवळ 100 रुपये एवढी फी असणार आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, जमाती, अपंग उमेदवारांना अर्ज शुल्क माफ करण्यात आलेली आहे.

परीक्षा कधी होणार ? | SSC CGL Bharati 2024

या भरतीसाठी टीयर 1 ची परीक्षा सप्टेंबर ऑक्टोबर 2024 मध्ये होणार आहे तर टियर 2 ची परीक्षा डिसेंबरमध्ये घेतली जाणार आहे.

अर्ज कसा करायचा ?

  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर होम वरील आपला या बटणावर क्लिक करा.
  • त्यानंतर सगळी माहिती भरा आणि नोंदणी करून अर्ज करा.
  • त्यानंतर कागदपत्र आणि फी जमा करा.
  • फॉर्म एकदा चेक करून सबमिट करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा