SSC CHSL Bharti 2024 | 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!! स्टाफ सिलेक्शन अंतर्गत 3712 पदांसाठी भरती

SSC CHSL Bharti 2024
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | SSC CHSL Bharti 2024 नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एकत्रित संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षेतून लवकरच बारावी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. याबाबतची माहिती कर्मचारी निवडणूक आयोगाने दिलेली आहे. ही भरती 3712 पदांसाठी होणार आहे. यासाठी 8 एप्रिल 2024 रोजी पीडीएफ देखील उपलब्ध झालेले आहे. लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर या पदांची भरती होणार आहे. 8 एप्रिल 2024 पासून या भरतीला सुरुवात झालेली आहे. तर 7 मे 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीसाठी अर्ज करा.

महत्त्वाची माहिती |  SSC CHSL Bharti 2024

  • पदांचे नाव – निम्न विभागीय लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
  • पदसंख्या – 3712 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
  • अर्ज शुल्क –
  • Women/SC/ST/PWD/Ex – परीक्षा शुल्क माफ
  • इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024

पात्रता निकष

  • अभ्यासक्रम
  • परीक्षा नमुना
  • परीक्षेच्या तारखा
  • अर्ज प्रक्रिया

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा