हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे दहावीतील विद्यार्थ्यांचे निकाल राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने रोखून ठेवले होते. त्यामुळे राज्यभरातील दहावीच्या विद्यार्थ्यांमधून निकाल कधी लागणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ट्विट करीत दहावीचा निकाल उद्याच होणार असल्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. १६ जुलै,२०२१ रोजी दु. १ वाजता जाहीर होईल. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा! अस शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
महत्त्वाची सूचना:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.१०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि.१६ जुलै,२०२१ रोजी दु.१:००वा. जाहीर होईल.सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा!#SSC #results @CMOMaharashtra pic.twitter.com/q8dKHn1PDv— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 15, 2021
कुठे पहाल निकाल –
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.com
या वेबसाईटस वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा यंदा कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट असल्याने रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. शालेय शिक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीनं दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी सूत्र ठरविले होते. यावर्षी दहावीच्या परिक्षेसाठी एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती.