हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इ.10 वीचा ऑनलाईन निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार. परंतु आता दहावीच्या निकालाची वेबसाईट हँग झाली आहे.
एकाच वेळी वेबसाईट वर लॉगिन केल्यामुळे ती साईट च हँग झाली असून त्यामुळे विध्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in, mahahsscboard.in वर निकाल उपलब्ध होणार आहे परंतु ही वेबसाईट हँग झाल्याने विध्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.
दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी खालीलप्रमाणे सूत्र ठरविले आहे.
1) विद्यार्थ्यांचे इ 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन – 30 गुण
2) विद्यार्थ्यांचे इ 10 वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन – 20 गुण
3) विद्यार्थ्यांचा इ. 9 वी च्या अंतिम निकालातील विषयनिहाय मिळालेल्या गुणांपैकी 50 गुण याप्रमाणं विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
JOB आणि शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या WhatsApp ग्रुपला Join व्हा