हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षेचा म्हणजेच दहावीचा निकाल (SSC Result 2024) आज जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल 95.81 % लागला असून यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 2.65 टक्के ने जास्त लागला आहे. महत्वाची बाब म्हणजे यावर्षी निकालामध्ये कोकण विभागानं बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र शेवटला फेकला गेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाबाबत माहिती दिली.
विभागनिहाय निकाल– SSC Result 2024
पुणे – 96.44%
नागपुर – 94.73%
संभाजीनगर – 95.19%
मुंबई – 95.83%
कोल्हापूर – 97.45%
अमरावती – 95.58%
नाशिक – 95.28%
लातूर – 95.27%
कोकण – 99.01 %
कसा चेक कराल निकाल –
दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईट दहावीचा निकाल (SSC Result 2024) पाहता येईल. यासाठी खालील संकेतस्थळांचा वापर करा
https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
https://results.targetpublications.org/
निकाल कसा पाहायचा
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर होम पेजवरील दहावीच्या निकालावर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुमचे लॉगिन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचे नाव या सगळ्यांची नोंदणी करायची आहे.
हे सगळे केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड देखील करता येईल, आणि प्रिंट देखील काढता येईल.