SSC Result 2025 Maharashtra Board : 10 वीचा निकाल उद्या लागणार!! या बेवसाईटवर चेक करा

SSC Result 2025 Maharashtra Board
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इयत्ता १० वीच्या निकालाबाबत (SSC Result 2025 Maharashtra Board) एक मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १० वीच्या निकालाबद्दल नवीन अपडेट देण्यात आली आहे. त्यानुसार, उद्या म्हणजेच १३ मे २०२५ रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता. तेव्हापासूनच दहावीचानिकाल कधी लागणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या. अखेर यावर पडदा पडला असून उद्या दुपारी १ वाजता १० वी चा निकाल जाहीर करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

उद्या मंगळवारी सकाळी अकरा वाजता बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर ऑनलाइन निकाल मंगळवारी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेतस्थळावर जारी होतील. बोर्डाकडून पत्रकार परिषदेत राज्याचा निकाल, मुलींचे आणि मुलांचे उत्तीर्ण प्रमाण, जिल्हानिहाय उत्तीर्ण आकडेवारी सांगितली जाईल. SSC Result 2025 Maharashtra Board

खालील वेबसाईटवर पहा 10 वीचा निकाल- SSC Result 2025 Maharashtra Board

https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org

अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन –

दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी वेगवेगळ्या कॉलेजच्या पायऱ्या चढावा लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची ही गैरसोय आणि धावपळ टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाने महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र बोर्डाने यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे. अकरावी प्रवेशासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ Mahafyjcadmissions.in याचा वापर पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा असं आवाहन महाराष्ट्र बोर्डाने केला आहे.