उंब्रज प्रतिनिधी । पुणे बंगळूर महामार्गावर कराड शहराजवळ वराडे गावाच्या हद्दीत रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला एसटीची पाठीमागून धडक बसून झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिक ते सांगली या मार्गावरील एसटी बस (MH 14 BT 4374) अपघात चेपली आहे. (satara News)
तसेच एसटीतील अन्य प्रवासीही जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास हि घटना घडली. अपघातात एसटी कंडक्टर व महिला गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कराड येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
दरम्यान, अपघातानंतर मोठा आवाज झाल्यानंतर वराडे गावातील स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एसटी बस मध्ये प्रवाशी अडकले होते. बसचा दरवाजा चेपला गेल्याने त्यांना बाहेर येण्यासाठी मार्ग नव्हता. नागरिकांनी प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली.