औरंगाबाद | कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, बस चालक हे काम करत आहे आणि महत्वाचे म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यांची अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रवासात मदत करणारे बस चालक यांच्याकडे एसटी महामंडळ दुर्लक्ष करत आहे.
कोरोनाच्या संकट समयी बस चालक काम करत असताना त्यांना जेवनाची सोय नाही आणि त्यांना विश्राम करण्यासाठी दिलेली जागेची देखील दयनीय अवस्था आहे. त्याचबरोबर कुठलीही स्वच्छ्ता केली जात नाही. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र संचारबंदी असताना देखील बस कर्मचाऱ्यांना अशा अवस्थेत काम करावं लागतं आहे.
हॅलो महाराष्ट्रने तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी सांगिले कि “आम्हाला भत्ता मिळात नाही आणि आम्ही शिवभोजन करून स्वतःचे पोट भरतात आहोत, महामंडळाने आम्हाला भत्ता द्यावा आणि राहण्याची, जेवणाचीं चांगली व्यवस्था करून द्यावी.” अशी मागणी त्यानी महामंडळाकडे केली आहे.