एस.टी.बसची ट्रॉलीला धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे

वाळवा तालुक्यातल्या साखराळे येथे राजारामबापू कारखान्यानजीक एस.टी.बसने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी घडला. या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे 2 लाखांचे नुकसान झाले आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर चालक बाबुलाल शेख हे ट्रॅक्टर हा दोन ट्रॉलीमध्ये मळी भरून घेवून लगुन खड्डयाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी पलूस आगाराचे चालक शिवाजी बाळू खोत हे एस.टी.बस घेवून इस्लामपूरच्या दिशेने निघाले होते.

दरम्यान कारखान्यानजीक ट्रॅक्टर डावीकडे वळण घेत असताना बसने ट्रॅक्टरच्या पाठीमागील ट्रॉली यास जोराची धडक दिली. या धडकेत एस.टी.बसमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर सुमारे अर्धा तास वाहतूक खोळबंली होती. जखमी प्रवाशांना उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबतची फिर्याद बाबुलाल हुसेन शेख यांनी दिली आहे.