लॉकडाऊन काळात देखील सुरू राहणार एस.टी ची बससेवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद: कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाभरात आज पासून 4 एप्रील दरम्यानच्या काळात अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच दर शनिवार आणि रविवारी कडक स्वरूपात लॉकडाऊन राहणार आहे. असे असले तरी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी सुरूच राहणार आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आलीय.

वाढत्या संसार्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अशंत: लाकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. या अशंत: लॉकडाऊनचा नागरिकांनी त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. लॉकडाऊच्या कार्यकाळात प्रत्येक नागरिकांनी स्वत:हून शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीचे कोटेकोरपणे पालन केल्यास निश्चितच हा संसर्ग आटोक्यात येईल.

जिल्हयाभरात 11 मार्च  ते 04 एप्रील पर्यत अशंत: लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊन दरम्यान राज्य परिवहन महामंडळाची (एसटी)ची बससेवा सुरूच राहणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी या पूर्वीच एसटीच्या अधिकाऱ्यासह चालक वाहक आणि प्रवाशांना कोरोनाचे नियम काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. मात्र प्रत्येक प्रवाशांनी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. या शिवाय शासनाने घालुन दिलेल्या नियम आणि अटीचे सुध्दा पालन करावे असे आवाहन एसटी प्रशासनाकडून प्रवाशांना करण्यात आले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment