हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ST Bus Ticket Hike – जे लोक ST , टॅक्सी आणि रिक्षाने प्रवास करतात त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. 2025 या नव्या वर्षात एसटी (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ) च्या प्रवासाचे दर वाढण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांनी प्रवास भाडेवाढीचा प्रस्ताव दिला असतानाच, एसटी महामंडळाने त्यांच्याकडून भाडेवाढीचा प्रस्ताव स्वीकारला आहे. त्यामुळे आजपासून एसटीच्या तिकीट दरवाढीचा निर्णय लागू झाला आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. तर चला हे नवीन दर काय असतील , याची माहिती जाणून घेऊयात.
14.95 % तिकीट दरवाढीला मंजुरी –
महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) बैठकीत 14.95 % तिकीट दरवाढीला (ST Bus Ticket Hike) मंजुरी मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने ही भाडेवाढ मंजूर केली असून, यामागे एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे वाढलेले दर, आणि सुटे भागांच्या किमतींमध्ये झालेली वाढ यांचा समावेश आहे. हे सर्व घटक लक्षात घेत, भाडेवाढ आवश्यक असल्याचे म्हटले आहे. पण याचा थेट परिमाण लोकांच्या खिशावर होणार आहे.
रिक्षा व टॅक्सीचे दर वाढणार (ST Bus Ticket Hike) –
ST च्या दरवाढीसोबतच आता ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचे भाडेही वाढवले जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांनी 3 रुपयांची वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे, रिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे 28 रुपयांवरून 31 रुपये होण्याची शक्यता आहे. ही भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक –
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ST च्या भाडेवाढीचा (ST Bus Ticket Hike) निर्णय महत्वाचा आहे, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली हि दरवाढ आज मंजूर करण्यात आली आहे. रिक्षा आणि टॅक्सी भाडे वाढवण्याबाबत मात्र अधिकृत निर्णय अजून घेतला नाही. प्रवासासाठी एसटी, रिक्षा, आणि टॅक्सीवरील भाडेवाढीचा प्रत्येक्ष परिणाम सामान्य प्रवाशांच्या खिशावर होईल. यामुळेच आगामी काळात अधिक खर्च येऊ शकतो.
हे पण वाचा : पाऊस, धुके अन गारठा…. राज्यात हवामान बदलाचा इशारा