औरंगाबाद | कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने, शहरासह जिल्ह्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. यामुळे प्रशासनाने शनिवार व रविवारी पूर्ण लॉक डाऊन घोषित केला. यामुळे एसटी बसेसवर याचा परिणाम पाहायला मिळाला. शनिवारी 60 ते 70 प्रवासी घटल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून शहरात व जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिस्थती नियंत्रणात राहावी यासाठी प्रशासनाने अंशतः लॉक डाऊन सुरू केला. यासह शनिवारी व रविवारी पूर्ण लॉक डाऊन करण्यात आला आहे. या नुसार दोन दिवस संपूर्ण व्यवहार बंद राहतील. परंतु एसटी बसेस सुरू ठेवण्यात आल्या आहे. या लॉक डाऊन चा थेट परिणाम एसटी बसेस च्या उत्पन्नावर झाला आहे. शनिवारी या बाबत पाहणी केली असता, 60 ते 70 टक्के प्रवासी घटले असल्याचे चित्र मध्यवर्ती बसस्थानकात पाहायला मिळाले. अनेक बसेस रिकाम्या होत्या. प्रवासी नसल्याने काही बसेस वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ पासून बस स्थानकात उभ्या होत्या.
नगर… नगर…. शिर्डी…. शिर्डी
अनेक वेळा नगर… नगर… असे शब्द खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या तोंडी पाहायला मिळतात. परंतु लॉक डाऊन मुळे चक्क एसटी महामंडळाचे चालक- वाहक नगर… नगर… शिर्डी…. शिर्डी…. अशा पद्धतीने प्रवाश्यांना बोलावताना दिसून आले.
कॅन्टीन सुरू पण केवळ पार्सल सुविधा ……
बस स्थानकातील कॅन्टीन सुरू होते. परंतु डायनिंग सुविधा बंद होती. यामुळे चालक वाहकाना पार्सल घेऊन जावे लागत होते. काही चालक व वाहकांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा