प्रवाशांना दिलासा ! जिल्ह्यात एसटी बसच्या फेऱ्या वाढल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एसटीचे कर्मचारी कामावर परतत असल्याने बसच्‍या फेऱ्या काही अंशी वाढल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा थोडासा दिलासा मिळाला आहे. रविवारी 81 बसच्या सहाय्याने तब्बल 270 फेऱ्या करण्यात आल्या. पुणे, नाशिक आणि अजिंठा लेणी मार्गावर 25 शिवशाही, आठ हिरकणी बस चालवण्यात आल्या. एकूण 4427 प्रवाशांनी प्रवास केला.

रविवारी औरंगाबाद-पुणे मार्गावर 17 शिवशाही चालवण्यात आल्या, त्यातून 726 प्रवाशांनी प्रवास केला. त्याचप्रमाणे नाशिक मार्गावर सहा शिवशाही पाठवण्यात आल्या, त्यातून 98 प्रवाशांनी प्रवास केला. सिडको आगार (क्र.1) मधून जालना मार्गावर 11 बस सुरु होत्या. त्यातून 291 प्रवाशांनी प्रवास केला. बीड मार्गावर 14 बसने 348 प्रवाशांना आपल्या इच्छित स्‍थळी सोडले. मध्‍यवर्ती बस स्‍थानक आगार (क्रं.2) येथून औरंगाबाद-कन्नड मार्गावर दोन बसने आठ फेऱ्या केल्या, त्‍यात 404 प्रवाशांनी प्रवास केला. सिल्लोड मार्गावर पाच बसने 10 फेऱ्या केल्या. त्‍याचा लाभ 127 प्रवाशांनी घेतला. पैठण मार्गावर दोन बसने आठ फेऱ्या केल्या त्‍याचा लाभ केवळ 219 प्रवाशांनी घेतला.

पैठण आगारातून औरंगाबाद मार्गावर सोडण्‍यात आलेल्या तीन बसने 10 फेऱ्या केल्या. त्‍यात 125 प्रवाशांनी प्रवास केला, जालना मार्गावर दोन बस सोडण्‍यात आल्या त्‍यात, 75 प्रवाशांनी प्रवास केला. शेवगाव मार्गावर एका बसने सहा फेऱ्या केल्या त्‍याचा लाभ केवळ 25 प्रवाशांनी उचलला. सिल्लोड आगारातून औरंगाबाद मार्गे एक बस सोडण्‍यात आली होती, त्‍याचा लाभ 50 प्रवाशांनी घेतला. तर वैजापूर आगारातून कोपरगाव आणि गंगापूरमार्गे प्रत्‍येकी एक बस सोडण्‍यात आली. त्‍यात एकूण 60 प्रवाशांनी प्रवास केला. कन्नड आगारातून औरंगाबाद मार्गे सोडण्‍यात आलेल्या तीन बसने दहा फेऱ्या करून 545 प्रवाशांना इच्छित स्‍थळी सोडले. गंगापूर आगारातून वैजापूर आणि औरंगाबाद मार्गावर प्रत्‍येकी एका बसने चार फेऱ्या केल्या. त्‍यात अनुक्रमे 57 आणि 65 प्रवाशांनी प्रवास केला. तर सोयगाव आगारातून अजिंठा लेणीसाठी दोन शिवशाही आणि आठ हिरकणीच्‍या माध्‍यमातून 115 फेऱ्या केल्याने 1875 प्रवाशांनी त्‍याचा लाभ घेतला.

Leave a Comment