एसटी संप सुरू असताना सातारा – स्वारगेट शिवशाही आजपासून प्रत्येक तासाला सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | एसटी कर्मचारी आजही आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून खाजगी वाहन चालकांकडून अर्थिक लूट केली जात आहे. अशावेळी सातारा आगारातून सातारा- स्वारगेट अशी शिवशाही बससेवा आजपासून सुरू करण्यात आल्याची माहिती प्रमुख रेश्मा गाडेकर यांनी दिली.

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत शासनात एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण करत नाही, तोपर्यंत संप माघार घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. आज पंधरा दिवस झाले हा संप सुरू आहे. याबाबत अनेकदा उचस्तरीय बैठका झालेल्या आहेत, मात्र तोडगा निघत नाही. अशा परिस्थितीत प्रवाशांची वाहन चालकांकडून मोठी पैशाची लूट केली जात असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा आगाराने शिवशाही बस आजपासून सुरू केलेली आहे.

याबाबत आगार प्रमुख रेश्मा गाडेकर म्हणाल्या, सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. अशात प्रवाशांचे हाल होत आहे. त्यामुळे खाजगी शिवशाही बस मार्फत सकाळी सहा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येक दर तासाला शिवशाही बस सोडण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Comment