ST Ticket Rate | ST चा प्रवास महागला; ऐन दिवाळीत वाढले तिकिटाचे दर

ST Ticket Rate
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ST Ticket Rate | आपल्या महाराष्ट्रात बहुतांश लोक हे एसटीने प्रवास करतात. नुकतेच महाराष्ट्रात वेगवेगळे सण साजरे होत आहे. दिवाळी देखील तोंडावर आलेली आहे. या काळात देखील अनेक लोक हे एसटीने प्रवास करत असतात. अशातच आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकताच एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ती म्हणजे आता एसटी महामंडळाने (ST Ticket Rate) यावर्षीच्या दिवाळीच्या काळात तिकिटांचे दर वाढवण्यात आलेले. हाती आलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने या वर्षी दिवाळी दहा टक्के भाडेवाढ जाहीर केलेली आहे. दरवर्षी सणासुदीच्या ST महामंडळ हंगामी भाडेवाढ करत असते.

या नियमानुसार एसटी (ST Ticket Rate) महामंडळाने या वर्षी देखील दिवाळीच्या आधी हे हंगामी भाडे वाढ जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करताना सर्वसामान्य नागरिकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. दिवाळीच्या काळात अनेक शहरात राहणारे लोक तसेच विद्यार्थी सुट्टीच्या काळात त्यांच्या घरी जात असतात. तसेच पर्यटनासाठी देखील जात असतात. परंतु आता हे फिरणे त्यांना थोडीशी खर्चिक होणार आहे. कारण एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ करण्यात आलेली आहे.

एसटी महामंडळाने (ST Ticket Rate) केलेले हे भाडेवाढ 25 ऑक्टोबर 2024 ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीसाठी असणार आहे. परंतु आधीच्या तिकिटाच्या दरानुसारच हे भाडे आकारले जाणार आहे. प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मात्र या दिवाळीत आर्थिक फटका बसणार आहे. परंतु एसटी महामंडळाला मात्र या निर्णयाचा फायदा होणार आहे. कारण गेल्या काही वर्षापासून एसटी महामंडळ हे तोट्यात आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाचा हा निर्णय त्यांच्यासाठी चांगला राहणार आहे. दिवाळीच्या काळात हंगामात सर्व प्रकारच्या बस तिकीटमध्ये वाढ करण्यात येणार आहे. परिवर्तन, शिवनेरी आणि शिवशाही यांसारख्या बसेसच्या तिकिटांवर देखील दहा टक्के भाडेवाढ केली जाणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून आलेली आहे.