हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Star Air Flights । बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच प्रवासी उड्डाणांची सुरुवात होणार असून प्रादेशिक एअरलाइन स्टार एअरने सुद्धा नवीन मुंबई विमानतळावरून सेवा सुरु करणार आहे. बंगळूर-मुख्यालय असलेल्या स्टार एअरने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. २५ डिसेंबरपासून, ही विमान कंपनी नवी मुंबई विमानतळावरून नांदेड, बंगळूर, गोवा आणि अहमदाबादसाठी उड्डाण करेल. स्टार एअरच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, ज्या सेवा सुरू केल्या जातील त्यात नवी मुंबई-बंगळूर (गोवा (मोपा) मार्गे), नवी मुंबई-गोवा (मोपा), नवी मुंबई-नांदेड (अहमदाबाद मार्गे) आणि नवी मुंबई-अहमदाबाद यांचा समावेश आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, स्टार एअर या मार्गांवर आपल्या विमानांच्या संचालनासाठी एम्ब्रेअर १७५ विमानांचा वापर करेल. एका निवेदनात, स्टार एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन सिमरन सिंग तिवाना यांनी म्हंटल की, नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सेवा सुरू करणे हे भारताला सोयीस्कर आणि वेळ वाचवणाऱ्या पर्यायांनी जोडण्याच्या” त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हे नवीन मार्ग नवी मुंबई आणि विस्तृत मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना स्टार एअरच्या सतत वाढणाऱ्या नेटवर्कद्वारे महत्त्वाच्या प्रादेशिक शहरांना सहज जोडतील, तसेच व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीसाठी नवीन संधी उघडतील,” असे तिवाना यांनी म्हंटल. Star Air Flights
स्टार एअरकडे १२ विमानांचा ताफा आहे- Star Air Flights
दरम्यान, संजय घोडावत ग्रुप (SGG) ची विमान वाहतूक शाखा असलेल्या स्टार एअरने २०१९ मध्ये आपले व्यावसायिक कामकाज सुरू केले. सध्या, या विमान कंपनीकडे १२ विमानांचा ताफा आहे, ज्यात ८ एम्ब्रेअर E175 आणि ४ एम्ब्रेअर E145 विमानांचा समावेश आहे. पुढील ३ वर्षांत हा ताफा २५ विमानांपर्यंत वाढवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
दरम्यान, २५ डिसेंबर पासूनच मुंबई विमानतळावरून सर्वत्र उड्डाणे सुरु होतील. यापूर्वी, अकासा एअर, इंडिगो आणि एअर इंडिया ग्रुपसारख्या आघाडीच्या विमान कंपन्यांनी मुंबईतील नवीन विमानतळावरून कामकाज सुरू करण्याची आपली वचनबद्धता व्यक्त केली होती.




