कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी बसमध्ये विशिष्ट रसायन फवारणी सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे. यातच कोरोनाचे दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. या लाटेत रुग्ण संख्या वाढण्याची जास्त शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून आणि आरोग्य विभागाकडून या लाटेला हरवण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता कोरोनाला हरवण्यासाठी बसमध्ये विशिष्ट प्रकारचे कोडींग करण्यात येणार आहे.

मध्यवर्ती बस स्थानकात विशिष्ट रसायानाद्वारे एसटी स्वच्छ आणि फवारणी करण्यात येत आहे. शनिवार पासून या कामाला सुरुवात करण्यात आली असून रविवारी सायंकाळपर्यंत 30 बसेसवर कोडिंग करण्यात आली आहे. अँटी मायक्रो बीएलचे कोडींग करण्यास सुरुवात करण्यात आली असून कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने या कोडींगचा प्रभाव दोन महिने राहतो.

‘कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत रुग्णसंख्या वाढू नये यासाठी मुंबई सेंट्रल कार्यालयाने फवारणीचा निर्णय घेतला असून मध्यवर्ती बस स्थानकातील सर्व म्हणजे दीडशे बसला ही फवारणी करण्यात येणार आहे.’ असे मध्यवर्ती बसस्थानकचे आगारप्रमुख सुनील शिंदे यांनी सांगितले

Leave a Comment