हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जर तुम्हीही कोणता व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला फार मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जास्तीत जास्त १० हजारात हा व्यवसाय सुरु करू शकता. होय, आम्ही बोलत आहोत – टिफिन सेवा व्यवसायाबद्दल. हा व्यवसाय घरातील महिलाही सुरू करू शकतात.
आजकाल प्रत्येक शहरात अनेक विद्यार्थी आणि नोकरदार लोक राहतात, ज्यांना स्वतःहून जेवण बनवता येत नाही. त्यामुळे त्यांना टिफिन सेवेची गरज आहे. अशा परिस्थितीत, त्या लोकांची मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्ही टिफिन सेवा व्यवसाय सुरू करू शकता. माऊथ पब्लिसिटी या व्यवसायात अधिक यशस्वी होत असल्याचे मानले जाते. टिफिन सेवा व्यवसाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.
किती रुपयात सुरु करू शकता व्यवसाय?
या व्यवसायाची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला यामध्ये जास्त पैशांची गुंतवणूक करावी लागणार नाही. सुरुवातीला 8000 ते 10,000 रुपयांपर्यंत तुम्ही हे सुरु करू शकता तसेच यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या जागेची गरज नाही, तर तुम्ही तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातूनही याची सुरुवात करू शकता. तुमची प्रसिद्धी जसजशी वाढत जाईल तसतसे तुमचे उत्पन्न दुप्पट होऊ शकत.
इतकी कमाई होईल-
जर लोकांना तुमचे जेवण आवडत असेल तर तुम्ही दर महिन्याला कमीत कमी ५० हजार ते ७० हजार रुपये कमवू शकता. आजकाल अनेक स्त्रिया घरबसल्या हा व्यवसाय करून चांगली कमाई करत आहेत