फडणवीस रोज पहाटे ४ वाजता राज्यपालांना फोन करून विचारतात मी पुन्हा येऊ का ??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरा हा नेहमी वेगवेगळ्या मुद्यांवरून सोशल मीडियावर चर्चेच असतात. त्याच्या भाजपविरोधी वक्तव्यामुळे तो नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना तो नेहमी निशाण्यावर घेत त्याच्यांची थट्टा करत असताना दिसतो. तर आता त्याने ट्वीट करत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होऊन राज्यपालांना फोन करतात असा टोला कामराने लगावला आहे.

कुणाल कामराने एक ट्विट केलं असून त्यामध्ये फडणवीसांचा उल्लेख केलाय. “जर तुम्हाला आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये अपयश येत आहे असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की देवेंद्र फडणवीस रोज पहाटे चार वाजता उठून तयार होतात आणि राज्यपालांना फोन करुन विचारतात, मी पुन्हा येऊ का?”, असं ट्विट कामराने केलं आहे. यामध्ये त्याने स्मायलीजचाही वापर केलाय.

यापूर्वी देखील कुणाल ने फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना म्हंटल होत की देवेंद्र फडणवीस पुन्हा कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाही याची मला खात्री आहे. दरम्यान, कुणाल कामरांसारखे अनेक काॅमेडियन राजकीय मुद्यांवरून भाष्य करताना दिसत आहेत. कुणाल कामराच्या एका ट्विटमुळे मध्यंतरी मोठा खळबळ उडाली होती. न्यायालयावर केलेल्या आक्षेपार्य ट्विटमुळे न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला होता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like