राज्यातील मोठ्या बाजार समित्या बंद झाल्यानं शेतकरी संकटात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 पुणे । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. बाजार समित्या बंद करताना कोणतीही पर्यायीव्यवस्था उभी न करता सरकारच्या या निर्णयामुळे शेजारी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समित्या बंद झाल्यानं फळे, भाजीपाला व फळभाज्या अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

दुसरीकडे साथीच्या काळात रोग प्रतिकारशक्ती तंदुरुस्त रहावी यासाठी ताजी फळे, फळभाज्या व पालेभाज्या यांचा आहारात समावेश असावा अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. बाजार समित्या बंद केल्यामुळे हा आहार शहरी ग्राहकांना न मिळाल्याने त्यांच्या रोग प्रतिकार शक्तीवर विपरीत परिणाम होणार आहे.

सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकरी व ग्राहकांना सहाय्यता व्हावी यासाठी शासनाच्या कृषी, सहकार व पणन या विभागांमार्फत शेतीमाल खरेदी व वितरणाची पर्यायी व्यवस्था उभी करावी. शेतकऱ्यांकडून तालुका स्तरावर शेतीमाल खरेदी करून नगर पालिका व नगर परिषदांच्या मार्फत शहरातील हौसिंग सोसायट्यांच्या मदतीने हा माल ग्राहकांपर्यंत पोहचावा व शेतकरी आणि ग्राहकांचे नुकसान टाळावे, अशी मागणी किसान सभा करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

Leave a Comment