Sunday, February 5, 2023

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी मॅनेजरने गळफास घेऊन केली आत्महत्या

- Advertisement -

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमधील बियाणी चौकात राहणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या डेप्युटी बँक मॅनेजरने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अनमोल बाबूराव शहाणे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री ८.३० वाजता घडली. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

अनमोल शहाणे हे बियाणी चौक येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर होते. ते याच परिसरातील प्रकाश देशमुख यांच्या घरी काही महिन्यांपासून आपल्या कुटुंबासोबत भाड्याने राहत होते. त्यांना मद्याचे व्यसन जडल्याने ते त्याच्या आहारी गेले होते. शनिवारी सकाळी सकाळीच त्यांनी मद्यपान करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांचा जेवण न केल्याने पत्नीशी किरकोळ वाद झाला. यानंतर ते आपल्या बेडरूममध्ये गेले. यानंतर पत्नीने रात्री ८.३० वाजता बेडरूमचे दार ठोठावले पण आतून काही आवाज आला नाही. यानंतर पत्नीने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.

- Advertisement -

या प्रकरणाची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बेडरूमचे दार तोडले तेव्हा त्यांना अनमोल यांचा मृतदेह पाळण्याच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या नंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आणि घटनेचा पंचनामा केला. ४ वर्षांपूर्वीदेखील लोणार येथे कार्यरत असताना अनमोल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता अशी माहिती अनमोल यांच्या पत्नीने पोलिसांना दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले करत आहेत.