State Bank of India SCO Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आणि आम्ही नेहमीच तुमच्यासाठी नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. त्यामुळे अनेक लोकांना नोकरी देखील मिळते. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांना बँकेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. परंतु अनेक कारणास्तव ही इच्छा पूर्ण होत नाही. परंतु आज आम्ही तुमच्यासाठी बँकेची अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SCO Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. याअंतर्गत उप उपाध्यक्ष, सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ विशेष कार्यकारणी या पदांच्या रिक्त जागा आहेत या पदांच्या एकूण 58 जागा आहेत आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून लवकरात लवकर अर्ज मागविण्यात आलेले आहेत. हे अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. त्याचप्रमाणे 24 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांना यासारख्या अगोदरच अर्ज करायचे आहेत. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
पदाचे नाव
या भरती अंतर्गत उपाध्यक्ष सहाय्यक, उपाध्यक्ष वरिष्ठ विशेष कार्य अधिकारी या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
रिक्त पदसंख्या | State Bank of India SCO Bharti 2024
या भरती अंतर्गत तब्बल 58 पदे भरली जाणार आहेत.
वयोमर्यादा
या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 45 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.
अर्ज शुल्क
या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला 750 अर्ज फी भरावी लागेल.
अर्ज पद्धती
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन अधिकृत वेबसाईटला भेट देऊन भरावा लागेल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
24 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे.
अर्ज कसा करायचा | State Bank of India SCO Bharti 2024
- या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- आम्ही खाली तुम्हाला एक लिंक देत आहोत.
- त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही अर्ज करू शकता.
- 24 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- त्यामुळे तुम्ही या तारखे अगोदरच अर्ज करायचा आहे.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा