State Bank Of India : SBI ची मोठी घोषणा!! 40 लाख घरांवर सोलर पॅनल बसवणार

State Bank Of India Solar Pannel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन State Bank Of India । देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चा आज ७० वा वर्धापन दिन दिवस आहे. १ जुलै १९५५ रोजी स्थापन झालेल्या या बँकेला आज तब्बल ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत बँकेने अनेक विक्रम करत देशातील बँकिंग क्षेत्रात मानाचे स्थान मिळवलं आहे. आजअखेर देशात करोडो ग्राहकांचे एसबीआय बँकेत खाते असून ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचा बँकेचा प्रयत्न कायम आहे. आज वर्धापनदिनी बँकेने एक मोठी घोषणा करत २०२७ च्या आर्थिक वर्षापर्यंत ४० लाख घरांवर सोलर पॅनल बसवणार असल्याचे जाहीर केलं आहे.

SBI चा जगातील 50 बँकेत क्रमांक- State Bank Of India

याबाबत बँकेने (State Bank Of India) आज एक निवेदन जारी करत म्हंटल कि, स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया अक्षय ऊर्जा संक्रमणात आघाडीची भूमिका बजावू इच्छिते. देशाचे नेट झिरो २०७० चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, २०२७ आर्थिक वर्षापर्यंत ४० लाख घरांना सौरऊर्जेने सुसज्ज करण्याची योजना आखत आहे. मागील ७० वर्षांपासून एसबीआय बँक देशवासियांना आपली बँकिंग सेवा देत आहे. ६६ ट्रिलियन डॉलर्सच्या बॅलन्स शीटसह आणि ५२० दशलक्षाहून अधिक ग्राहकांसह, बँकेने ८ व्या दशकात प्रवेश केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात मजबूत आधारस्तंभ असून जगातील टॉप ५० बँकांच्या यादीत स्टेट बँकचा समावेश आहे. १९५५ मध्ये स्थापनेपासून, स्टेट बँक ऑफ इंडिया भारताच्या विकास उद्दिष्टांना पाठिंबा देत आहे. डिजिटल आणि हरित अर्थव्यवस्थेला एसबीआयने नेहमीच पाठिंबा दिला आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) निवासी सौर छत प्रकल्पांना निधी देण्यासाठी आशियाई विकास बँक (ADB) सोबत $९०.५ दशलक्ष कर्ज करारावर स्वाक्षरी केली. निवासी क्षेत्रात सौर छतावरील प्रकल्पांच्या स्थापनेला पाठिंबा देण्यासाठी एसबीआयने २०२३ मध्ये जागतिक बँकेकडून १६५ दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देखील उभारले आहे. ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यावर बँकेचे लक्ष्य आहे आणि डिजिटायझेशन, मानकीकरण आणि केंद्रीकरणाद्वारे तिच्या व्यापार वित्त ऑपरेशन्सचे आधुनिकीकरण करत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ६ सहयोगी बँका आहेत. यामध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर (SBBJ), स्टेट बँक ऑफ म्हैसूर (SBM), स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (SBT), स्टेट बँक ऑफ हैदराबाद (SBH), स्टेट बँक ऑफ पटियाला (SBP) आणि भारतीय महिला बँक (BMB) यांचा समावेश आहे. या सर्व बँकांचे १ एप्रिल २०१७ रोजी SBI मध्ये विलीनीकरण झाले. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या देशभरात २२००० हून अधिक शाखा आहेत. ६५००० हून अधिक एटीएम आणि ७६००० हून अधिक आउटलेट देखील आहेत.