हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भाजपकडून या ना त्या कारणांवरून निशाणा साधला जातोय. आज भाजप नेते किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार शशिकांत शिंदेंवर टीका केली. तर दुसरीकडे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारातील मंत्र्याची खासियत,” असे उपाध्ये यांनी म्हंटले आहे.
प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीटरवरुन मंत्री जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ” दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारातील मंत्र्याची खासियत. आधी सरकारकडून जमिन घ्यायची मग सरकारनेच अधिग्रहीत केली म्हणून सरकार कडून भरभक्कम मोबदला घ्यायचा. सरकार असो सहकार, स्वाहाकार हाच मंत्र हीच यांची घोषणा’, असे उपाध्ये याची म्हंटले आहे.
दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारातील मंत्र्याची खासियत. आधी सरकारकडून जमिन घ्यायची मग सरकारनेच अधिग्रहीत केली म्हणून सरकारकडून भरभक्कम मोबदला घ्यायचा. सरकार असो सहकार, स्वाहाकार हाच मंत्र हीच यांची घोषणा pic.twitter.com/TWiR2Irn8A
— Keshav Upadhye (@keshavupadhye) October 20, 2021
इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्याच्या नावाखाली सरकारकडून नाममात्र दरात मिळवलेल्या जमिनीचा काही भाग महामार्ग विस्तारीकरणात गेल्यानंतर त्याचा मोबदला संबंधित शिक्षणसंस्थेनं मिळवल्याचं प्रकरण समोर आले आहे. ही संस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी संबंधित असल्याने भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याबाबत ट्वीटरवरुन जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.