राज्य, केंद्र सरकारकडून नुकसानग्रस्थांच्या मदतीसाठी प्रयत्न करणार – प्रवीण दरेकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ढगफुटीसद्रूश्य पावसामुळे चिपळूण तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली. या ठिकाणच्या अनेक भागात पाणी साचून एनडीआरएफचे पथक पुण्याहून चिपळुणात रात्री उशिरा दाखल झाली. या ठिकाणी झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी सकाळी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे, विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस हे आज महाड, चिपळूण या जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी रवाना झाले. केंद्र व राज्य यांच्या माध्यमातून नुकसानग्रस्त भागाला मदत व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

महापुरामुळे चिपळूण शहरातील बाजारपेठ, खेर्डीमध्ये पाच फुटांपेक्षा जास्त पाणी शिरले तसेच दोन्ही बाजारपेठा पाण्याखाली गेल्या. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना भयानक अशा परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. कोकण, महाड, चिपळूण भागातीळ नागरिकांचे जीव मात्र, परत येणार नाहीत. मात्र, त्या ठिकाणी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तेथील भागाचा राजकीय नेत्यांकडून दौरा केला जाणार आहे.

दरम्यान आजही चिपळूण भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे. तर आज कोकण, महाड, चिपळूण भागांचा केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे, विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दौरा केला जात आहे.

You might also like