State Co-Operative Bank | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या (State Co-Operative Bank) कर्मचाऱ्यांसाठी आम्ही एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता या कर्मचाऱ्यांसाठी बँकेने आजीवन पेन्शन योजना जाहीर केलेली आहे. यावर्षी बँकेला खूप चांगला नफा झालेला आहे. बँकेला 615 कोटींचा नफा झालेला आहे. त्यामुळे यावर्षी कर्मचाऱ्यांना 10% चा लाभ देखील जाहीर केलेला आहे. याबाबतची माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर आनस्कर यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
नुकतेच 19 सप्टेंबर रोजी राज्य सहकारी बँकेची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथील मुख्य कार्यालयात झालेली आहे. यावेळी या सभेला माजी खासदार आनंदराव अडसूळ बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे सरव्यवस्थापक आनंद भुईभारी हे सगळे उपस्थित होते.
राज्य सरकारी बँकेने पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांसाठी आजीवन पेन्शन योजना जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे या योजनेला बँक कर्मचारी संघटनेचे निवृत्त संघटक सचिव धर्मराज मुंडे यांचे नाव देण्यात आलेले आहे. जाहीर केलेल्या या आजीवन पेन्शन योजने अंतर्गत सध्या काम करत असलेल्या 5007 कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर दर महिन्याला 10 हजार रुपये एवढे पेन्शन आजीवन मिळणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक बँकेने केलेली आहे.
राज्य बॅंकेने हे मागील आर्थिक वर्ष 609 कोटींचा नफा कमवलेला आहे. तसेच यावर्षी बँकेला 615 कोटींचा नफा झालेला आहे. म्हणजेच बँकेच्या नफ्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आणि ही एक कौतुकास्पद गोष्ट आहे असे सांगण्यात आलेले आहे. त्यामध्ये आता शासनाकडून पोटी प्राप्त झालेल्या कोणत्याही रकमांचा समावेश नाही. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर 10 टक्के लाभ कर्मचाऱ्यांना देणे हे बहुमताने मान्य झालेले आहे.