Tuesday, January 31, 2023

चंद्रकांत पाटलांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी बँकेची चौकशी लावली; हसन मुश्रिफांचा आरोप

- Advertisement -

कोल्हापूर । राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना सहकार विभागाच्या अहवालामध्ये क्लिन चिट देण्यात आली आहे. यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत पाटलांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी माझं नाव घालून बँकेची चौकशी लावली होती, असा आरोप हसन मुश्रीफ यांनी केलाय.

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी क्लीन चिट मिळाल्यानंतर प्रतिक्रिया देताना हसन हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ”मुळात महाराष्ट्र राज्य बँकेचा हा घोटाळा नव्हताच. मी बँकेच्या एकही बैठकीला उपस्थित नव्हतो, तरीही चंद्रकांतदादा पाटील यांनी माझं नाव घातलं. चंद्रकांत पाटील यांनी केवळ माझा काटा काढण्यासाठी बँकेची चौकशी लावली. पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ 88 लावली, मात्र त्याच्या चौकशीसाठी अधिकारी चंद्रकांत पाटील यांनी आणले. सत्ता असताना भाजपमध्ये अनेक नेते गेले होते. मी चंद्रकांतदादांना म्हणालो होतो ही सत्तेचं सूज आहे. आता ती सूज आता कमी व्हायला सुरुवात झालीय,” असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है! असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला. ते म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट येत आहे, नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. जो कोणी मास्क घालणार नाही त्याला दंड ठोठावला पाहिजे, असं देखील मुश्रीफ म्हणाले. दरम्यान, राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने अपल्या अहवालात क्लीन चिट दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलासा मिळाला आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.