निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय; मदरसातील शिक्षकांच्या पगारात केली वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून वेगवेगळे महत्त्वाचे आणि नागरिकांच्या फायद्याचे निर्णय घेतले जात आहेत. राज्यातील प्रत्येक नागरिकाला आकर्षित करण्याचा आणि मत मिळवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू झालेला आहे. अशातच आता राज्य सरकारने मुस्लिम आणि अल्पसंख्यांक गटांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. ते म्हणजे आता राज्यातील मदरसांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पगारांमध्ये राज्य सरकारने तीन पट वाढ करण्याची घोषणा केलेली आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या असताना मुस्लिम बांधवांना खुश करण्यासाठी महायुती सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता शिक्षकांच्या पगारांमध्ये तीन पट वाढ करण्यात आलेली आहे. मदर्सांमध्ये शिकवणाऱ्या डीएड पदवी असलेल्या प्राथमिक शिक्षकांचा पगार हा 6000 रुपये होता. तो आता 16 हजार रुपये करण्यात आलेला आहे. तसेच बीएड पदवी असलेल्या माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार हा 8000 होता. तो आता 18000 करण्यासाठी सरकारकडून घेण्यात आलेला आहे.

राज्य सरकारने मुस्लिम बांधवांसाठी हा एक मोठा निर्णय घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाद चालू झालेला आहे.bत्यामुळे आता विधानसभा निवडणुका पूर्वी महाराष्ट्र सरकार मुस्लिम कार्डचा वापर करत असल्याचा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. त्यांचे आरोप भाजपने फेटाळून लावलेले आहे. शिक्षण ही आमची पहिली पहिले प्राधान्य आहे. शिक्षण देणारी कुठल्याही संस्था कुठल्याही धर्माची असो त्यात आम्ही भेद करत नाही. अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केलेले आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता मदारासांमधील शिक्षक देखील खूप आनंदी आहे. पगार वाढ झाल्याने त्यांचे आर्थिक स्थिती सुधारेल असा आशावाद शिक्षकांनी व्यक्त केलेला आहे. परंतु विरोधी पक्षातून मात्र महायुती सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. आणि त्यांनी घेतलेला हा निर्णय आता विधानसभा निवडणुकीसाठी किती फायदेशीर ठरणार आहे. हे पाहणे महत्त्वाचे आहे.