Tuesday, March 21, 2023

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टला राज्य सरकारची मान्यता

- Advertisement -

पुणे । महापालिकेच्या माध्यमातून कैलासवासी मा. पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावे वैद्यकीय महाविद्यालय उभारले जात आहे. या महाविद्यालयासाठी ट्रस्ट स्थापन व्हावे अशी संकल्पना पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ते स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मांडली होती. त्यांनी विविध पातळ्यांवर त्याचा पाठपुरावाही केला होता. आता या संकल्पनेला राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून सांगितले आहे. त्यासंदर्भात झालेल्या बैठकीचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांनी या महाविद्यालयाला राज्य सरकारच्या मान्यतेनंतर पुढील कारवाई लवकरच सुरु करण्यात येईल असे सांगितले आहे. ट्रस्ट स्थापन करण्याच्या दृष्टीने महापालिकेत बैठक घेण्यात आली. आणि पुढील कार्यवाही वेगाने व्हावी यासाठी सूचना देण्यात आल्या. महाविद्यालयाच्या संदर्भातील सर्व विभागांच्या तांत्रिक बाजूंचा आढावा यावेळी घेण्यात आला. त्यायोगे संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

 

या बैठकीसाठी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, राजेंद्र मुठे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, आरोग्यप्रमुख डॉ रामचंद्र हंकारे, भवन रचना मुख्य अभियंता लंके यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अशी माहिती त्यांनी ट्विटमधून दिली आहे. मोहोळ यांनी महाविद्यालयाला मान्यता व निधी उपलब्ध करून दिला होता. डॉ नायडू सांसर्गिक रुग्णालय परिसर भागात १० एकर परिसरात हे रुग्णालय बांधले जाणार आहे. गेल्यावर्षी मुख्यसभेत २८ ऑगस्ट ला महाविद्यालयाला मान्यता मिळाली होती. काही तांत्रिक मान्यता घेऊन पुढच्या वर्षी जून मध्ये महाविद्यालय सुरु करण्याचा मानस असल्याची माहिती मिळाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.