भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करणे राज्यसरकारचे षडयंत्र- आमदार राणा जगजितसिंह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उस्मानाबाद : भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करणे हे षडयंत्र असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच हे निलंबन मागे घेण्याची मागणी सुद्धा भाजपच्या वतीने जोर धारत आहे. संदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तटस्थपणे सत्य सांगण्याची मागणी भाजप नेते राणा जगजितसिंह यांनी केली आहे.

आमदार राणा जगजितसिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून झिरवळ यांना ही विनंती केली आहे. या संदर्भात ते म्हणाले की, ‘भारतीय जनता पार्टीच्या १२ आमदारांचे निलंबन हे एक सुनियोजित षडयंत्र होते. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तटस्थपणे दालनातील सत्य सांगावे. विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर बसल्यानंतर पक्ष, भूमिका, तत्वे बाजूला पडतात. तटस्थपणे सत्ताधारी, विरोधकांचे मत जाणून घेणे व त्यावर योग्य तो तोडगा काढणे, ही आपली संसदीय प्रणाली आहे. पण पदाची गरीमा व पावित्र्य भंग करण्याचे काम तालिका अधिकारी आ. भास्करराव जाधव यांनी केले आहे. आम्ही उपस्थित केलेल्या ओबीसी समाजाबद्दलच्या प्रश्नांचे उत्तर ना. छगन भुजबळ यांनी दिले नाही. त्यांच्याकडून जनतेची दिशाभूल करणारे वक्तव्य केले जात होते. अशात विरोधी पक्षाची बाजू मांडण्याची संधीच न देता, रेटुन परस्पर ठराव मंजूर करण्यात आला.’

इतकेच नाही तर हा प्रकार दूर्देवी असल्याचेही राणा जगजितसिंह यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, ‘विधानसभा अध्यक्षांच्या दालनातील प्रकार दूर्दैवी होता, पण त्याचे अतिरंजीत व असत्य कथन आ. भास्करराव जाधव यांनी कले. त्यांनी सांगितल्या प्रमाणे अपशब्ध कोणीही वापरले नव्हते. ३ वेळा कामकाज तहकूब करून १२ सहकाऱ्यांच्या निलंबनाचे सुनियोजित षडयंत्र महाविकास आघाडीकडुन करण्यात आले. आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेला विविध रंग दिले गेले. पदाचे पावित्र्य व गरिमा अबाधित राखण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांनी तटस्थपणे दालनातील वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवावी अशी अपेक्षा आहे’.

Leave a Comment