एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारचा तेरावा; सूर्याजी पिसाळाला सोडणार नाही ; सदाभाऊ खोत यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने विलीनीकरणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर संप केला जात आहे. दरम्यान आज कर्मचाऱ्यांच्या वतीने भाजप आमदार गोपीचंद पडळकर, शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सरकारचा तेरावा घातला. यावेळी अनिल परब सारख्या सूर्याजी पिसाळाला आता सोडणार नसल्याचा इशारा खोत यांनी दिला.

यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, विदर्भ, मराठवाडा येथील एसटी कर्मचारी आंदोलन करीत असताना परिवहनमंत्रीम्हणतायत कि एसटीचे खासगीकरण करायला निघाला आहे. आता खासगीकरण करूनच दाखवा. कर्मचाऱ्यांनो लक्षात ठेवा सूर्याजी पिसाळ हा तुम्हाला त्रास द्यायला येणार आहे. त्याला पत्नीसह जाऊन साडी, चोळी द्यायचे. निलंबन झाले तर एकाच माणसाचे होणार आहे त्या माणसाचे नाव आहे अनिल परब. त्याचेच निलंबन होणार आहे. राज्य सरकारने आता आमच्या संयमाचा अंत पाहू नये.

एसटीच्या शासकीय विलीनीकरणाच्या मागणीवर परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून तोडगा काढला जात नसल्याने एसटी कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या वतीने आज आक्रमक पावित्रा घेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचा तेरावा घातला.

You might also like