कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड :-राज्यात आणि जिल्ह्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. लोकांच्यात गांभीर्य नाही, नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात पोलिस खाते अॅक्शन मोड काम करणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित प्रशासन अधिकार्यांच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकरांशी बोलत होते.
या बैठकीस प्रातांधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे, पोलीस उपअधिक्षक डॉ.रणजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रदिप पाटील उपस्थित होते. ना.देसाई म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढे नियमांची कडक अमलंबजावणी करण्यात येणार आहे. तपासणीवेळी दुकानात पाचपेक्षा जास्त माणसे आढळली तर 15 दिवसांकरिता दुकान बंद करण्याची कारवाई केली जाईल.
सर्व प्रकारच्या यात्रा, उत्सव मेळावे यांना बंदी आहे. तसेच लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त माणसे आढळल्यास लग्न मालकांसह हॉल मालकांवरही गुन्हे नोंद केले जाणार आहेत. कोरोनाचा रेट 1800 वरून सात हजारांवर गेलेला आहे. तिप्पट, चौप्पट वाढ झालेला आहे. त्यामुळे यापुढे कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी पोलिस खाते अॅक्शन मोडमध्ये आलेले आहे अस गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’