..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत; आव्हाडांची भाजपवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या संकटाच्या आडून काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत, असा थेट आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. राज्यात कोरोनाच्या परिस्थितीबाबत आरोप-प्रत्यारोपांचं हे सत्र सुरू असतानाच गुजरात उच्च न्यायालयानं तेथील सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. हाच धागा पकडून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.

‘गुजरातमधील रुग्णालयांची अवस्था ही अंधार कोठडीपेक्षा बिकट आहे, असं गुजरात उच्च न्यायालयानं म्हटल्याचं आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून निदर्शनास आणलं आहे. मुंबई व महाराष्ट्रातील परिस्थिती चांगली असल्याचं सांगताना त्यांनी नीती आयोग व आयसीएमआरचे दाखलेही दिले आहेत. तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करत आहेत,’ असा संताप त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या देशात सर्वाधिक आहे. दिवसागणिक बाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यातील विरोधी पक्ष भाजपनं या मुद्द्यावरून सरकारवर टीका सुरू केली आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत काही दिवसांपूर्वी भाजपनं आंदोलनही केलं होतं. दरम्यान, कोरोनाशी लढण्याचं मुंबईनं अवलंबलेलं मॉडेल देशातील सर्वोत्तम आहे. ते देशभर राबवा असं खुद्द नीती आयोग आणि आयसीएमआरनं (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) म्हटलं आहे.

त्याचबरोबर राज्य सरकारनं भाजपचे सर्व आरोप वेळोवेळी खोडून काढले आहेत. मुंबईत चाचण्यांचं प्रमाण जास्त असल्यानं रुग्णांची संख्या वाढत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. शिवाय, मुंबईत मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे, असा सरकारचा दावा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment