राज्यमंत्री बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण ; राज्यात कोरोनाची चिंता वाढली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून आता मंत्रिमंडळातील मंत्र्यांना देखील कोरोनाची लागण होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या नंतर आता शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu corona positive) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. बच्चू कडू यांनी संपर्कातील व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केलं आहे.

नक्की कोण आहेत बच्चू कडू –

ओमप्रकाश बाबाराव कडू उर्फ बच्चू कडू हे अमरावतीतील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. ते ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे अध्यक्ष आहेत. सत्तास्थापनेवेळी महाविकास आघाडी सरकारला त्यांनी पाठिंबा दर्शवला होता. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला आणि बाल विकास, कामगार या मंत्रालयांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे अकोल्याच्या पालकमंत्रिपदाचीही धुरा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment