लतादीदींच्या निधनाने राज्यात दुखवटा; सरकारी कार्यालये, शाळा- महाविद्यालय सोमवारी बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर देशभरातुन दुःख व्यक्त होत आहे. राज्य सरकार कडून लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार उद्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयं देखील बंद राहणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असं राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात नमूद केलं आहे. त्यानुसार उद्या राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसह शाळा, महाविद्यालयं देखील बंद राहणार असल्याचं सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने देखील यापूर्वीच 2 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मुंबई येथील शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान यावेळी उपस्थित राहतील.

Leave a Comment