राज्य महसूल व ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पाच हजार वृक्षारोपण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आज रराज्याचे महसूल व ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते आज पाच हजार वृक्षांचे वृक्षारोपण विद्यापीठ परिसर बुद्ध लेणीच्या परिसरात करण्यात आले.

शहरांमध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या वतीने तसेच फाउंडेशनच्या वतीने बुद्ध लेणी परिसर असेल तसेच गोगाबाबा टेकडी परिसर असेल या परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे वृक्षारोपण करण्यात येते. तसेच महानगरपालिकेचे आयुक्त अस्तिक कुमार पांडे यांनी देखील ‘माझी नदी खाम नदी’ या उपक्रमांतर्गत नदीच्या काठावर हजारो झाडे लावण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या भाषणात असे सांगण्यात आले की 5000 झाड वाचवण्यासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये निधीची सोय करण्यात येईल. शहरातील सध्याचे आमदार प्रदीप जैस्वाल यांनीदेखील निधी देण्याची कबुली देण्यात आली. त्यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मध्येचे आमदार प्रदीप जयस्वाल. भीमराव हत्तीअंबीरे, विजय सुबुकडे आदींची या कार्यक्रमात उपस्थिती होती

Leave a Comment