बंडातात्या कराडकर अडचणीत : महिला आयोगाकडून गंभीर दखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्य प्रकरणी राज्य महिला आयोगाने लक्ष घातले आहे. महिलाबद्दल बंडातात्यांनी केलेल्या वक्तव्या बद्दल सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करुन या बाबतचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे.

काल साताऱ्यात व्यसनमुक्ती संस्थेच्या आंदोलनात ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकरांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केलेली. याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करीत पोलिसांना अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “बंडा तात्या कराडकर यांनी खासदार सुप्रियाताई सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल जे वादग्रस्त वक्तव्य केल आहे, ते अत्यंत संतापजनक आहे. त्यांच्या या वक्त्व्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोचलेला आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

सातारा पोलीसांनी या वक्तव्याबाबत बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करावी. याचा अहवाल 48 तासाच्या आत महिला आयोगास सादर करावा. तसेच बंडातात्या कराडकर यांनी सात दिवसाच्या आत आपला लेखी खुलासा आयोगास सादर करावा”, अशी मागणी चाकणकर यांनी केली आहे.

बंडातात्या यांनी काल सातारा येथे केलेल्या अक्षेपार्ह विधानामुले राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी कराडकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. कराडकर स्वत:ला कीर्तनकार म्हणवतात आणि अशाप्रकारे स्त्रीत्वाचे धिंडवडे काढतात. हे खपवून घेतले जाणार नाही. त्यांनी जाहीररित्या माफी मागावी, अशी मागणी केली त्यांनी केली आहे.

Leave a Comment