चिमुकल्यांचे निवेदन : मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मुख्याधिकार्‍यांना निवेदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड शहरातील पाटण कॉलनी येथे मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या वर्षभरात या कॉलनीतील मुलांच्यावर मोकाट कुत्र्यांनी अनेकदा हल्ला केल्याची घटना घडलेलया आहेत. या कुत्र्यांकडून लहान मुलांवर हल्ले केले जात असल्याने याबाबत लहान मुलांनी कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना कुत्र्यांचा बंदोबस्त तात्काळ करावा, अशा मागणीचे बुधवारी निवेदन दिले आहे.

कराड शहरातील पाटणकर कॉलनीत गेल्या वर्षभरात लहान मुलांच्यावर अनेकदा जीवघेणे हल्ले झालेले आहेत. या मोकाट कुत्र्यांच्यापासून स्वताचा बचाव करण्यासाठी लहान मुलांना अनेक साधने स्वतासोबत बाळगावी लागतात.कॉलनी परिसरात मोकाट कुत्र्यांनी मुलांच्यावर पाळत ठेवून त्यांचा पाठलागही केल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. याबाबत पालिकेला येथील नागरिकांनी अनेकवेळा निवेदने देऊन कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणीनीही केली आहे.

मोकाट कुत्र्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज पाटण कॉलनीतील चिमुकल्या मुलांनी पालिकेचे मुख्याधिकारी डाके यांना निवेदनही दिली. यावेळी अ‍ॅड. श्रीकांत घोडके म्हणाले, आमच्या कॉलनीत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी गेली वर्षभर नगरपालिका मुख्याधिकारी यांना वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत. मात्र याकडे पालिकेकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले आहे. या मोकाट कुत्र्यांनी अनेकवेळा लहान मुलांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. त्यामुळे आता नगरपालिकेने आठ दिवसाच्या आत या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Comment