लोणंद प्रतिनिधी । सुशिल गायकवाड.
खंडाळा तालुका डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रश्नी निवेदन देण्यात आलेले आहे.यावेळी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश खराटे यांच्या सह सर्जेराव भोसले, मनोहर जावळे, गोविंदराव जावळे, उत्तमराव वाघमारे, संजय जाधव, यशवंत खुंटे, बाबुराव खुंटे , जयकुमार खरात, दत्तात्रय कडाळे, तात्या गायकवाड, सुजाता जावळे, लिलाबाई वाघमारे आदींनी या निवेदनावर स्वाक्षरी केलेल्या आहेत.
दिलेल्या निवेदनात असे म्हटलेले आहे की,पंचायत समिती खंडाळा येथील आवारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक जागेचे विस्तारिकरण मंजूर करून सदर जागेत सर्व सुविधांनीयुक्त सभागृह इमारत बांधकाम व बांधकाम निधी मंजुरी देण्यात यावी.तसेच याबाबत सविस्तर माहिती स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष व माजी प्राचार्य सुरेश खराटे यांनी दिलेली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने पंचायत समिती खंडाळा आवारातील किसनवीर सभागृहाला लागून असलेल्या छोट्या इमारतींची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी मिळावी आणि किसनवीर सभागुहाच्या दक्षिण बाजूच्या भिंतीपासून विस्तारित अखंड जागेत सर्व सुविधांनियुक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह/ इमारत बांधकाम करण्याबाबत आ.मकरंद पाटील यांना १२५ व्यक्तींच्या सह्यांचे निवेदनात दिले होते.आ. मकरंद पाटील यांनी तत्कालीन कृषी सभापती मनोज पवार व तत्कालीन सभापती पंचायत समिती खंडाळा मकरंद मोटे यांच्याशी चर्चा केली असता या सर्वांनी आपली सकारात्मक भूमिका असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.
आमदार यांनी या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेऊ असे सांगितले होते.असे निवेदनात सुरेश खराटे यांनी म्हटलेले आहे.एकंदरीत आ.मकरंद पाटील यांनी सदरचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह व्हावे ही तीव्र इच्छा आहे.सन २०१९-२० मध्ये त्यांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधीतून या कामासाठी सहा लाख रुपयांचा निधी खर्ची टाकलेला आहे.पंचायत समिती खंडाळा सभेमध्ये या विषयावर चर्चा करून किसनवीर सभागृहाचे दक्षिण बाजूस लागून असलेल्या छोट्या इमारतीची जागा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह/ इमारत बांधकामासाठी देणे बाबतचा ठराव मंजूर करावा ही विनंती खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांना निवेदनाद्वारे केलेली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’