क्रांती चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा ‘या’ तारखेपर्यंत शहरात

औरंगाबाद – शहरातील क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा 21 फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी चौथ्या चे काम पूर्णत्वाकडे आहे. हा पुतळा पुण्यातील धायरी येथील थोपटे स्टुडिओमध्ये घडविला आहे. हा पुतळा शहरात आणण्याची तयारी सुरू झाली असून, 23 जानेवारीपर्यंत पुतळा शहरात येईल, अशी माहिती शिल्पकार दीपक थोपटे व शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी दिली.

मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडेय यांनी याबाबत काल बैठक घेतली शिल्पकार खोपडे यांनी सांगितले की, शिवरायांचा पुतळा 25 फूट उंच, 21 फूट लांब व 8 फूट रुंद तर 10 टन वजनाचा आहे. पोलिसांची परवानगी घेऊन शिवरायांचा पुतळा मोठ्या ट्रकमध्ये ठेवण्यात येईल शुक्रवारी दुपारी पुण्यातून हा पुतळा निघेल. औरंगाबाद येथे पोहोचण्यासाठी त्याला दोन दिवस लागतील. त्यामुळे रविवार पर्यंत पुतळा शहरात येईल.

शिवजयंतीपूर्वी फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पुतळ्याचे अनावरण होण्याची शक्यता आहे.