विशेष प्रतिनिधी । गुजरातमध्ये उभारण्यात आलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळं केवडिया हे छोटे शहर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. गेल्या अकरा महिन्यात २६ लाखांहून अधिक पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. यामुळे आतापर्यंत तब्बल ७१.६६ कोटी रुपयांचा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला आहे. येत्या काही दिवसांत येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, अशी अपेक्षा सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नर्मदा धरणापासून जवळ असेलला सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा अर्थात स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यात आला आहे. हा पुतळा जगात सर्वात उंच आहे. गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळं केवडिया हे गुजरातमधील छोटे शहर प्रसिद्धीच्या झोतात आले आहे.
हा पुतळा पाहण्यासाठी लाखो पर्यटक या ठिकाणी येत आहेत. गेल्या ११ महिन्यांत २६ लाखांहून अधिक पर्यटकांची येथे भेट दिली. त्यामुळं राज्याला तब्बल ७१.६६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. दरम्यान राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, येत्या ३१ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील अनेक योजनांचे उद्घाटन करणार आहेत. त्यामुळं येत्या काळात पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.