तंदुरुस्त रहा आणि इन्शुरन्स प्रीमियमवर सवलत मिळवा, IRDAI च्या नवीन उपक्रमांबद्दल जाणून घ्या

0
44
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आयुष्यात चांगल्या आरोग्याला प्राधान्य दिले आहे. आरोग्याविषयी इथे अनेक श्लोक, सुविचार आणि म्हणी प्रचलित आहेत. ज्यामध्ये उत्तम आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती मानली जाते. जसे- ‘पहिले सुख हे निरोगी शरीर आहे’ आणि ‘आरोग्य हे हजारो वरदान आहे’. अर्थात निरोगी राहिल्यास आजारांवर होणारा खर्च कमी होईल. फिटनेस हा देखील तुमच्या बचतीचा एक मोठा आधार आहे.

आरोग्याचा तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होतो. आता इन्शुरन्स बद्दलच बोलायचे झाले तर एक सिस्टीम लाँच केली जात आहे ज्यामध्ये तुम्हांला तुमच्या आरोग्यानुसार इन्शुरन्सचा प्रीमियम भरावा लागेल. तुमची मेडिकल हिस्ट्री चांगली असल्यास आणि तब्येत चांगली असल्यास, तुम्हाला इतर लोकांपेक्षा कमी प्रीमियम भरावा लागेल.

इन्शुरन्स रेग्युलेटर (IRDAI) ने फिटनेस केंद्रित लोकांसाठी इन्शुरन्स प्रीमियमवर सूट देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. IRDAI ने यासंदर्भात नियम बनवण्यासाठी इन्शुरन्स कंपन्यांकडून सूचनाही मागवल्या आहेत. मात्र, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आरोग्यावर अनेक प्रकारच्या सवलती आहेत. आता लाईफ इन्शुरन्स पॉलिसीमध्येही असा दिलासा आणि सूट समाविष्ट करण्याचा विचार आहे.

इन्शुरन्स कंपन्यांनाही होतो फायदा
जिथे पॉलिसीधारक व्यक्तीला फिटनेसवर वेगळ्या सूटचा लाभ मिळेल, तिथे इन्शुरन्स कंपन्यांनाही याचा लाभ मिळेल. कारण जेव्हा लोकं निरोगी असतील, तेव्हा क्लेमचे प्रमाणही कमी होईल. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) या नवीन उपक्रमाच्या निमित्ताने लोकांना तंदुरुस्त आणि निरोगी जीवनासाठी प्रेरित करेल.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फिट लोकांना इन्शुरन्सवर दोन प्रकारचे फायदे दिले जाऊ शकतात, ज्यामध्ये दोन प्रकारे इन्सेन्टिव्ह देण्याची योजना आहे. इन्शुरन्स कंपन्या पॉलिसीधारकाला व्हाउचर, रिवॉर्ड पॉइंट्सद्वारे इन्सेन्टिव्ह देतील आणि यासाठी कंपन्या ग्राहकांना जिम किंवा योग केंद्राची मेम्बरशिप देऊ शकतात.

याशिवाय, योग्य व्यक्तीला पॉलिसी रिन्‍युअलच्या वेळी प्रीमियममध्ये सूट दिली जाऊ शकते. इन्शुरन्सची रक्कम वाढवण्याचा पर्यायही पॉलिसीमध्ये दिला जाऊ शकतो. त्यामुळे या वाढत्या महागाईत तुम्हांला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचे असेल आणि इन्शुरन्सचा फायदा घ्यायचा असेल, तर आजपासूनच तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणे सुरू करा. लोकांना आरोग्याबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारनेही ‘फिट इंडिया कार्यक्रम’ सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here